आज बर्याच दिवसांनंतर त्याला हासताना पाहिलं, ती तिच्या मैत्रिणीला सांगत होती.पण काहिही म्हण त्याच्या या हासर्या चेहर्याकडे पाहुन याच्या प्रेमात न पडलेली मुलगी शोधूनही सापडणार नाही विणाच्या तोंडून हे वाक्य सहजच निघून गेला.
खर पाहायला गेलं तर तोही काही त्या काळातला दिलीपकुमार वगैरे न्हवता पण प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील राजकुमार मात्र नक्कीच होता.खरं सांगू का विणा मी त्याला गमवायला नको होता. रेवाच्या या वाक्याने खरंतरं विणाला खुप राग आला होता, पण ती शांत होती. खरंतरं त्याच्या आठवणीने ती कधी भुतकाळात गेली हे तिचं तिलाच कळालं नाही.
याची भेट झाली ते मुळात कॉलेज च्या पहील्या दिवशी, त्याला पाहताच क्षणी विणा त्याच्या प्रेमात पडली. दिसायला अतिशय सुंदर, जिच्या एका होकारासाठी तरसणार्यांची रांग, अशी ही पोरगी दिपकच्या प्रेमात कशी पडली हे मात्र सर्वांसाठी कोडं होतं. दिपक म्हणजे स्वताःत रमणारा प्राणि, त्याचे स्वप्न हेच त्याच्यासाठी सर्वस्व होत. एकिकडे त्याच्या प्रेमात अखंड बुडालेली ती, तर दुसरीकडे त्याला या गोष्टीचा सोयरसुतकही न्हवतं.का कोण जाणे तिलाही हे इतक्यात दिपकला सांगायचं न्हवतं.
दिवस पुढे जात होते, एकिकडे विणा भरपूर अभ्यास करुन परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवत होती,तर दिपक कसाबसा काठावर पास होत होता. बघता बघता पहीलं वर्ष संपलं आणि या दोघांनी दुसर्या वर्षात प्रवेश घेतला.एव्हाना हे दोघेही एकमेकांचे खास दोस्त झाले होते आणि सोबतचं यांची जोडी इतरांच्या डोळ्यात खुपायला लागली होती. दोघांच्या जोडीच्या चर्चा आता रंगायला लागल्या होत्या, पण दिपकला याचं सोयरसुतकचं न्हवतं.
आश्यातच तीची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली. थोडीशी सावळी पण नाकी डोळी अतीशय सुंदर असलेल्या रेवाला पाहुन दिपक कधी प्रेमात पडला हे त्याचं त्यालाच ठाउक न्हवतं.
काही ना काही कारणाने दिपक आणी रेवा आता भेटायला लागले होते, कधी पुस्तकाची देवाणघेवाण असो किंवा अजून काही. अश्यातच कल्चरल फेस्ट् चं बिगूल वाजलं मग तर काय आता भेटायला आयतं कारणच मिळालं होतं. रेवा दिपक सोबतं अॅंकरींग करणार हे ऐकल्यावर विणा ला तसं वाईटच वाटलं पण दिपक च्या चेहर्यावरील आनंदापोटी ती काहीच बोलली न्हवती.
आता दिवसेंदिवस विणा आणि दिपकचं भेटणं कमी झालं होतं, विणा च्या प्रत्येक फोन ला "आत्ता जरा बिझी आहे नंतर बोलू" हे दिपकचं ठरलेलं उत्तर यायला लागलं होतं. विणा पण त्याच्यावरील प्रेमापोटी याकडे दुर्लक्ष करत होती, पण गोष्टी आपल्या हातून निसटतायेत याची तिला सतत जाणीव होत होती.
शेवटी तिने दिपकला मनातली गोष्ट सांगायचं पक्क ठरवलं. कल्चरल डे च्या दिवशी आपण हे धाडस करायचचं हा निश्चय करून ती झोपायला गेली. दिपकच्या विचारात तिला कधी झोप लागली हे तिचं तिलाच कळालं नाही.
शेवटी तो दिवस उजाडला, लाल रंगाचा घाघरा घातलेली विणा एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती. आता दिपक स्टेजवरुन खाली उतरला की याला प्रपोज करायचं या तयारीत ही होती. दिपक टाळ्यांच्या गजरात स्टेजवर चढला रेवा तिथे आधीच त्याची वाट पाहात होती. आपल्या हातातील गुलाबाचे फुल त्याने रेवाला दिले आणी रेवाने ही त्याला मिठी मारली.
ऐकीकडे दिपक आणि रेवाच्या प्रेमाचा गुलाब कोमेजण्या साठी फुलला होता तर दुसरीकडे एक कळी नं फुलताच कोमेजली होती.
— ईशान