माझे हे हृदय मी तुझ्या हृदयात गुंफले,
आयुष्यभर राहू दे ही साथ तुझी अशी,
वेडे माझे मन हे असे तुझ्यात गुंतले!
कोरी स्वच्छ पाटी आपण हाती घेऊ,
आपल्या भविष्याचे धडे त्यावर गिरवू,
चुकले जर काही तर ते टाकू पुसून,
एकमेकांना आयुष्यभर साथ देउ हसून !
चुकले माझे काही, चुकले असेल ही तुझे,
आठवणींच्या अश्रूंनी आयुष्य हे असे भिजे,
नविन आठवणींचा एक बंगला बांधून घेउ,
एकमेकांवर प्रेम करण्यात आता स्वतःस विसरून जाऊ !