पण खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालोय का?
पारतंत्र्याच्या इतिहास तर वाचून झाला ,
पण खरंच आपण भानावर आलोय का?
पारतंत्र्याच्या जोखडातून बाहेर पडताना जे रक्त सांडले,
या भूमीच्या कित्येक वीरांनी आपले आयुष्य खर्चले,
त्याची किंमत करताना आपण कुठे चुकतोय का?
इतिहास तर वाचून झाला पण खरंच आपण भानावर आलोय का?
धर्म, जात, पंथ याच्या बंधनात आपण अडकलों,
वेळप्रसंगी आपल्याच भावांच्या जीवावर उठलो,
आपल्यातच भांडून आपण कुठेतरी चुकतोय का?
इतिहास तर वाचून झाला पण खरंच आपण भानावर आलोय का?
माझा भारत महान हे आम्ही नेहमीच म्हणतो,
प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या दिवशी आम्ही देशाचे गोडवे गातो,
पण देशाला महान बनवण्यासाठी आपण खरंच झटतोय का?
इतिहास तर वाचून झाला पण खरंच आपण भानावर आलोय का?
हे प्रश्न आपल्या पडतात म्हणजे खरंच आपण चुकतोय का?
चुकत असू तर स्वतः ला बदल्यांसाठी आपण प्रयत्न करतोय का?
खरंच आपल्या देशाची किंमत करताना आपण कुठे चुकतोय का?
इतिहास तर वाचून झाला पण खरंच आपण भानावर आलोय का?
वेळ गेली नाहीये अजून चला आपण स्वतः ला बदलू,
देशाच्या विकासात सर्वतोपरी सहकार्य करेन ही प्रतिज्ञा आज करू,
स्वतः ला च विचारू देशाच स्वातंत्र्य अबाधित राखण्यााठी आपण योगदान देतोय का?
इतिहास तर वाचून झाला पण खरंच आपण भानावर आलोय का?
- ईशान नांदेडकर