स्वप्न राहातात मग मागे, आणि काळ मात्र सरकत जातो,
अपेक्षा असते आयुष्यभर, ती फक्त निर्मळ साथीची,
पण आपणच मागे राहातो, आणि काळ सरकत जातो !
आपण असतो अती स्वच्छंदी, स्वतःमधे रमणारे,
येते अचानक ती अशी, मनात घर करणारी,
आणि आपणच मग स्वताःला, हे असे विसरून जातो,
मग आपणच मागे राहातो, आणि काळ सरकत जातो !
आता होते जाणिव जेंव्हा, स्वतःच्या गरजांची,
होते आठवण मग , आपण पाहिलेल्या स्वप्नांची,
मनात आपण आता, स्वताःहा साठी जगुया म्हणतो,
आणि येते मग ती पुन्हा, आणि आपण स्वताःला विसरून जातो !