Thursday, 28 December 2017

खुशींयो के पल तुम समेटना सिखो

माना ये जिंदगी कुछ अजीब सी है,
पर जैसे भी है तुम हसना सिखो,
काश ये तुम्हे मुकाम तक ना पहुंचाये,
पर तुम खुशीयों के पल समेटना सिखो!

उंची शिखर पर तुम चढ जाओ,
या फिर किसी ढालसे फिसल जाओ,
जिंदगी के हर पल को जिना सिखो,
खुशीयों के पल तुम समेटना सिखो!

भागते भागते कभी थक जाओगे,
चलते चलते ही रुक जाओगे,
कभी रुककर सांस भी लेना सिखो
खुशींयो के पल तुम समेटना सिखो!

जिंदगी काफी लंबी है,
कभी जितोगे तो कभी हार जाओगे,
हसते हुये हर हार को भुलना सिखो,
खुशीयों के पल तुम समेटना सिखो!

Wednesday, 29 November 2017

ना जाने ये जिंदगी क्यूं रुठ गयी है!

ना जाने ये जिंदगी क्यूं रुठ गयी है,
जिने की उम्मिद कही तुट  गयी है!

अब सुबह के बाद तो सिधा रात होती है,
दोस्तो से भी अब सोशल मिडीया पे ही बात होती है,
दोस्ती के नाम की चाय भी अब थंडी हुइ है,
ना जाने ये जिंदगी क्यूं रुठ गयी है!

अब जब गिरते है तब खुद संभलना होता है,
गलतीयों मे ना अब किसीका साथ होता है,
लोगो के साथ होते भी अब ये जिंदगी अकेली हुयी है,
ना जाने ये जिंदगी क्यूं रुठ गयी है!

बेहेते पानी मे छोडी कश्तीया अब डुब गयी है,
कागज के जहाज उडाने वाली हवा भी तो थम गइ है,
बचपन की वो यारी भी तो छुट गइ है,
ना जाने ये जिंदगी क्यूं रुठ गइ है!

मांगता हू भगवान से वो पुराने पल वापस देना,
बोहोत मुश्किल है यार इन दोस्तो के बिना जिना,
पर फिरसे मिलने की उम्मिद भी तो अब तुट गइ है,
ना जाने ये जिंदगी क्यूं रुठ गइ है!

Friday, 22 September 2017

तुझे भुलना चाहाता हुं


तुही सासो मे है तु ही है धडकन मे है
तेरे बिना जिने का मतलब ही क्या है!

तेरे साथ बिताये पल आज भी मुझे याद है,
तेरा वो हसीन चेहरा आज भी मेरे साथ है!
तेरे तिखे नैन आज भी मुझे सताते है,
तेरे बिना जिना कितना मुश्किल है ये बतलाते है!

जिस दिन तू मुझे छोड गयी,मानो मै जिना भुल गया था,
तेरे दिल के दरवाजे पे, सारी यादे छोड गया था!
पर पता नाही ये यादे क्युं वापस आ जाती है,
साथ बिताया हर क्षण मुझे याद दिलाती है!

अब इन यादो को कई दुर छोडकर मै फिरसे जिना चाहाता हुं,
देखे थे जो सप्ने उने पुरा करना चाहाता हुं
किया था तुझसे प्यार ईसमे कोई संदेह नही,
पर आज सब भुलकर मै फिरसे उडना चाहाता हुं!

Wednesday, 30 August 2017

तो आणि ती —२

    तिने त्याचा हात घट्ट पकडला होता. माणसाला ही उडवेल एवढ्या ताकदीचे वारे,धो धो कोसळणारा पाउस आणि सोबतीला अवेळी पडलेला अंधार, सगळेच कसे भयावह होते. एकमेकांना साथ देत कमरे एवढ्या पाण्यातुन ते दोघे चालू लागले. अचानकच पाण्याची लाट येइ आणि हे दोघे अलग होत पण लगेच तो तिचा हात पकडी. त्याच जवळ असणंच तिच्यासाठी अश्या परिस्थितीत धिर देणारं होतं.
    तिन वर्षांपूर्वी या दोघांच लग्न झालं होतं. एकमेकांना साथ देत त्यांनी तिन वर्ष तर मजेत काढली पण आज त्यांची जणू काही अग्निपरीक्षाच होती. गेल्या दोन तासांपासुन " शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देउ" हे एकमेकांना दिलेलं वचन ते तंतोतंत पाळत होते.
    पुर्वा आणि राहुल दोघेही एका नामांकित IT कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. रोज सकाळी लवकर उठुन घरातले कामं आटपायचे, डबा बनवायचा आणि आॅफिसला पळायचं हा त्यांचा रोजचा दिनक्रम. राहुलही पुर्वाला प्रत्येक कामात मदत करायचा.एकूणच दोघही संसारात छान रमले होते.
   आज पुर्वाने राहुलला उठताचक्षणी आपल्याला डाॅक्टरांकडे जायचय ही आठवण करुन दिली. दोघांनीही आज आॅफिसला सुट्टि टाकली . डाॅक्टरांना भेटायचं आणि मग मस्त पैकी सिनेमा पाहायचा आणि मग बाहेरचं जेवण असा मस्त बेत होता.पण नियतीच्या मनात काय होते कुणास ठाउक.
   राहुल आणि पुर्वा तुम्ही आइ बाबा होणार आहात. डाॅक्टरांच्या वाक्याने दोघांचे चेहरे फुलले. दवाखान्यातून निघताना दोघांच्या मनात आता नवचैतन्य पसरलं होतं. बाहेर पावसानेही आपलं रुप दाखवायला सुरवात केली होती. बघता बघता रस्त्यांवर कमरे इतक्या उंचिचं पाणी जमायला लागलं .आणि त्यातनं एकमेकांचा हात धरुन हे दोघे चालत होते.
    अचानक त्या दोघांचा हात सुटला आणी पाण्याच्या वेगामुळे पुर्वा त्याच्यापासून दुर जायला लागली. राहुल ने तिच्यापर्यंत पोहोंचण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. आता दोघांनीही देवाचा धावा करायला सुरुवात केली,कारण तोच यातन ह्या दोघांना एकत्र आणू शकणार होता.
    पुर्वाचे डोळे उघडले तेंव्हा ती दवाखान्यात पलंगावर पडली होती. नर्सला विचारल्यानंतर तिला कळालं, रस्त्याच्या एका कडेला बेशुद्ध अवस्थेत ही एकाला सापडली त्या माणसाने वेळेत हिला दवाखान्यात आणलं आणि हिचा जिव वाचला पण डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही तिच्या पोटातला जिव ते वाचवू शकले नाहीत. पण राहुल कुठे आहे ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच न्हवतं. त्याच्यावीना आयुष्य कसं काढायचं या विचाराने तिला कापरं भरलं.
     तिकडे राहुल ला शुद्ध आली तेंव्हा तिच्या जवळ नसण्याच्या आठवणीने त्याला सुन्न केलं. ती जिवंत असेल का नाही हेही माहीत न्हवतं. तिला आयुष्यात परत भेटता येईल का नाही या विचारातच तो दवाखान्यातल्या रुम मधून बाहेर आला.
     ईकडे राहुलच्या आठवणीने कावरीबावरी झालेल्या पुर्वाने रडतच राहुलला आवाज दिला आणी नेमका बाहेरुन जाणार्या राहुलच्या तो कानावर पडला.राहुल ने त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. पुर्वा दिसताच धावत जाउन त्याने तिला मिठीत घेतलं, आणि दोघही आनंदाश्रूनी भिजून गेले.आज परत एकदा प्रेमाने सगळ्या संकटांवर मात केली होती.
    

Tuesday, 2 May 2017

माणसाची गोष्ट

आजे ए आजे उट की गं, ओ दादा बगा की उटतच नाय ही, काय झालं असलं हीला? आजुबाजूची जमा झालेली गर्दी पाहुन तो भानावर आला. कोणीतरी खांद्यावर हात ठेउन त्याला धिर देण्याचा प्रयत्न केला तसा तो ओक्साबोक्षी रडायला लागला.
   राहुल एक गोंडस मुलगा, जन्मला तेंव्हा 11 पौंडाचा होता म्हणे.आइ बाबा अगदी फुलासारखे जपत होते त्याला पण म्हणतात ना नियती कधी काय खेळ करेल हे सांगता येत नाही.त्यादीवशी देवदर्शनासाठी म्हणुन हे निघाले आणी रस्त्यात गाडीचा अॅक्सीडेंट झाला.राहुल चे आई बाबा तिथेच दगावले आणि हा गोंडस पोर मात्र अनाथ झाला.  रस्त्याच्या कडेने जाणार्या त्या म्हातारीने वेळेत त्याला पाहीला आणि त्याला आपल्या घरी घेउन आली.
    68 वर्षांची रख्मा आजी, परीस्थीतीमूळे क्रुश झालेलं शरीर. हिचं म्हणावं असं कुणीच नाही.,कुठून आणि कशी गावात आली देव जाणे. म्हातारी खुप धीट होती कोणालाही गरज असो म्हातारी नेहमी मदतीला हजर. कुठून शिकली होती देव जाणे ही गावची वैद्य पण होती, हिचा हात लागावा आणि कोणताही आजार चुटकीसरशी बरा व्हावा पण याबद्दल विचारलं असता ती म्हणायची "त्या पांडुरंगाची विच्छा बग,त्योच सगळ्याचा कर्ताधर्ता". अशी हि म्हातारी राहुलला पहील्यांदा घरी घेउन आली तेंव्हा "म्हातारी स्वताःला सांभाळू शकत नाही लेकराला काय सांभाळणार" म्हणुण लोकं खिल्ली उडवायला लागली. काही जणांणी तर तिला लेकरु आणलंस तिथे सोडुन दे असा फुकटचा सल्ला सुद्धा दिला पण म्हातारी कसलं ऐकतेय तिने जणू या लेकराला वाढवायचा विडाच ऊचलला होता.
     दिवसामागे दिवस जात होते तसा राहुल मोठा होत होता. आता त्याला समजायला लागलं,माय शिवाय आपलं कोणं नाय हे त्याच्या लक्षात यायला लागलं होतं. आता हा शाळेत जायला लागला, पुस्तकी शिक्षणाबरोबरच म्हातारीची शिदोरी याच्या बरोबर होतीच. हळू हळू राहुल सगळ्यांचा लाडका बनत चालला होता, अभ्यासात हुशार आणि खेळात चपळ असणार्या राहुल कडे पाहिल्यानंतर म्हातारीचा उर भरुन येइ पण त्याच्याच बरोबरीला आपल्यानंतर याचं कोणं असेल हा विचार तिला अस्वस्थ करुन जाइ.
    म्हातारी आता जास्तच क्रुश व्हायला लागली होती, राहुलही २० वर्षाचि झाला होता.याचं लग्न लाउन द्यावं आणि जवाबदारीतून मुक्त व्हावं हा विचार म्हातारीच्या मनात घरं करायला लागला,पण यांना साथ देइल ती नियती कसली. ज्या घरातून राहुलच्या लग्नाची वरात निघावी तिथे आज म्हातारीला खांदा द्यायला लोकं जमली होती.
     आजी ला शेवटचा निरोप देउन आलेला राहुल आज शांतपणे कोपर्यात बसला,त्याच्या माय विना त्याला घर खायला उठलं होतं. तिच्याविना आपलं इथे कोणीच नाही मग जगायचं तरी कोणासाठी हा विचार करुन राहुल घरासमोरील विहीरीत जिव देण्यासाठी निघाला. बाहेर जाण्यासाठी म्हणुण त्याने घराचा दरवाजा उघडला आणि दारासमोर टोपलीत ठेवलेल्या 3 महीन्यांच्या लहानग्या जिवाकडे पाहुन थबकला. जिव देण्याचा विचार आता त्याच्यापासून कोसो दुर लांब होता. त्या लहानग्या जिवाला अलगद हातात उचलून राहुल घरात आला.पुन्हा एकदा एका लहानग्या जिवाने कोणालातरी जगण्याची प्रेरणा दिली होती.

एकदा खरच कोणावर तरी जिवापाड प्रेम करावं

एकदा खरच कोणावर तरी जिवापाड प्रेम करावं,
फक्त आणि फक्त तिचचं होउन राहावं,
नको त्रास आणि नको कसली चिंता,
तिच्या आनंदात आपलं स्व पण विसरुन जावं।

ती आणी मी असं दोघच कुठेतरी जावं,
तिच्या हातात हात देउन स्वप्नाच्या दुनियेत भटकावं,
मग हळुच तिच्या नकळत तिचं लाजणं निरखावं,
फक्त आणि फक्त तिचं होउन जावं।

साथ सुटेल का या भितीने तिच्या डोळ्यात आलेलं पाणि आपल्या हातांनी पुसावं,
वेडे मी फक्त तुझाच आहे म्हणुण तिला अलगद कवेत घ्यावं,
तिच्या फुललेल्या चेहर्यात भान हरपून जावं,
फक्त आणि फक्त तिचचं होउन राहावं।

सखी

  आज तो सकाळी उठला,उठताच क्षणी त्याने बायकोला आवाज दिला. ती पण रागातच खोलीत आली.
   एकदीवस पण हा माणूस स्वतःचे कामं स्वताः करत नाही, लग्न झालेल्या दिवसापासून नुसती राबतीये मी ह्याच्यासाठी.लग्नाआधी काय काय वचनं दिले होते, मी तुला सगळ्या कामात मदत करेन वगैरे. पण कसलं काय स्वताःहाचं काम पणं धड करणार नाही हा. ऐवढं बोलुन तीने कपाट उघडले आणि समोर नवीन साडी बघुन आवाक झाली. ती भानावर येईस्तोर त्याचे हात तिच्या खांद्यावर होते. त्याने हळूच तिच्या कानात महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि ती पण वळुन त्याला बिलगली. ते दोघे भानावर आले ते स्वराच्या आवाजाने. स्वरा म्हणजे त्यांच्या संसार रुपी वेलीवर फुललेलं एक सुंदर फुल. स्वराला उचलुन घेउन त्याने एक छोटसं गिफ्ट तिच्या हातातं दिलं आणि या दोघी आयुष्यात आल्या म्हणुण देवाचे मनोमन आभार मानले.
     राहुल आणि मिहीरा सहा वर्षापूर्वी लग्न झालेलं जोडपं,तसा त्यांचा प्रेमविवाह झालेला पण एकदम रितसर पद्धतीने म्हणजे अगदी कांदापोह्याच्या कार्यक्रमा पासुन बरं का. याचं कारण विचारल्यावर राहुल म्हणे " पोरगी पटवली म्हणुण कांदेपोहे सोडायचे होयं".
     राहुल म्हणजे एकदम खट्याळ मुलगा.प्रत्येकावर जोक करणारा, सततं सगळ्यांना हसत ठेवणारा. वेळ पडली तर अगदी व्यवस्थीत पणे बाजू पलटवायची कशी हे याच्याकडून शिकावं. दिसायला उंचापुरा, नाकीडोळी छान असा हा मुलगा. IIM मधून MBA केलेला हा मुलगा एका नामांकीत कंपनीत नुकताच रुजू झाला होता. आधी कॉलेज मद्ध्ये आणि आता कंपनीतही हा "The most wanted munda" या नावाने प्रसिद्ध होता. किती मुली ह्याच्यावर मरायच्या हे त्याचे मित्रच छान सांगू शकतील.
     मिहीरा अगदीच विरुद्ध, रंगाने सावळी पण तरीही चार चौघात उठून दिसेल अशी. MA Arts झालेली ही मुलगी, स्वताःच्या स्वप्नांना भरपूर महत्व देणारी, स्वप्न म्हणजेच सर्वस्व असणारी ही मुलगी. हिला अर्थशास्त्राची शिक्षीका व्हायचं होतं. अनेक मोठ्या घरातील मुलांना नाही म्हणण्याचं एकमेव कारण हिची करीयर बद्दल ची ओढ हेच होतं.
      यांच्या आयुष्यातली नेहमीसाठी लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे अजयचं लग्न. शेरवानी घातलेला राहुल त्यादीवशी जास्तच राजबींडा दिसत होता. नवरदेवापेक्षा जास्त हाच चमकत होता असं म्हणायला हरकत नाही. मित्रांच्या घोळक्यात बसलेल्या याची नजर नेमकी गुलाबी साडितल्या धावपळ करणार्या मिहीरावर पडली आणि Love at first sight का काय म्हणतात ते झालं. "आयला किती सुंदर आहे ही" हे नकळतंच त्याच्या तोंडून निघालं. मग काय सुरु झालं या सुंदर मुलीचा पाठलाग करायला. कोण आहे ही काय करते याची माहीती काढण्याची उत्सुकता शिगेला पोहोंचली. आज अज्या भेटला की विचारु त्याला असा विचार करुन राहुल कामाला लागला पण कसलं काय त्याच्या नजरेसमोरुन ती परी हटेल तरं ना.
   मिहीराच्या विचारात अख्खा दिवस निघून गेला. संध्याकाळी घरी येताच त्याने अजय कडुन मिहीरा ची इत्यंभुत माहीती काढली आणि मग सुरु झालं ते मिहीराला पटवायचं मिशन. मिहीरा ही त्याच्या झालेल्या वहिनीची जवळची मैत्रीण त्यामुळे काम अजुनच सोपं होणार होतं.
     एव्हाना राहुल आणि मिहीराचं आता बोलणं सुरु झालं होतं. जमेल तसं भेटणं, फोनवर तासनतास बोलणं याची सुरुवात आता झाली होती. आग दोनो बाजू लगी थी मात्र पुढाकार घ्यायला कोणीच तयार न्हवतं अश्यातचं राहुल ला कंपनीच्या कामासाठी सहा महिने परदेशात जायची आॅफर आली.त्याला सोडण्यासाठी मिहीरा देखील आली होती.आता काही महिने भेट होणार नाही म्हणुण दोघही दुखिः होते. लवकर परत ये मी वाट बघेन असं म्हणुण मिहीराने त्याला निरोप दिला.
   दिवसामागून दिवस जात होते, दोघांनाही प्रत्येक दिवस हा वर्षासारखा वाटत होता.दोघही डोळ्यात तेल घालुन भेटिची वाट पाहात होते. दिवसेंदिवस दोघांचं एकमेकांबद्दलचं आकर्षण वाढतच चाललं होतं. परत आलं की आता वेळ न घालवता हिला लग्नासाठी मागणी घालायची हे राहुलं चं पक्क होतं,तर इकडे हा बोलला नाहितर आपण स्वताःच याला मागणी घालू हे मिहीराने मनोमन ठरवलं होतं
   राहुल त्याच्या परदेशवारी हुन परतला आणि त्याने मिहीराला काॅफीसाठी आमंत्रण दिलं. संध्याकाळी नेहमीच्याच हाॅटेलात सात वाजता भेटायचं ठरलं. मिहीरा काळ्या रंगाच्या गुडघ्यापर्यंत असलेल्या one piece मध्ये आली होती, जणू काही अप्सराच दिसत होती ती. निळा शर्ट आणि काळी जिन्स घातलेल्या राहुलला पाहाताच ती धावत जाउन त्याला बिलगली आणि क्षणाचा ही विलंब न करता राहुलने ही तिला प्रपोज करुन त्यांच्या नात्यातली फाॅर्मॅलिटी पुर्ण केली. राहुल आणि मिहीरा आता नव्या नात्यात बांधले गेले होते आणि आता खरी परिक्षा सुरु झाली होती.
   राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवलेली मिहीरा जेंव्हा "आपण आता लवकर घरी सांगुन लग्न करुया म्हणाली" तेंव्हा राहुल ला जवाबदारीची जाणिव झाली. मग लगेच दोघांनीही घरी सांगीतलं. मिहीराच्या घरच्यांनी राहुलला नाकारायचा प्रश्नच न्हवता. नाही म्हणायला राहुल च्या घरुन थोडा विरोध झाला पण शेवटी त्याच्या हट्टासमोर घरचे तयार झाले. आणि राहुल आणि मिहीराच्या संसाराला सुरुवात झाली.
  राहुल अरे लक्ष कुठाय तुझं? कसला विचार करतोयेस? मिहीराच्या या प्रश्नाने जुन्या आठवणीं मध्ये रमलेल्या राहुलची तंद्री मोडली. लवकर तयार हो आणि आॅफिसला जाताना स्वराला शाळेत सोड यावर राहुल ने  होकारार्थी मान हलवली आणि तो आंघोळीला पळाला. आज पुन्हा एकदा संसारातील जवाबदारिने त्याच्या रोमॅंटीक मुड वर पाणी फिरवलं होतं.