एकदा खरच कोणावर तरी जिवापाड प्रेम करावं,
फक्त आणि फक्त तिचचं होउन राहावं,
नको त्रास आणि नको कसली चिंता,
तिच्या आनंदात आपलं स्व पण विसरुन जावं।
ती आणी मी असं दोघच कुठेतरी जावं,
तिच्या हातात हात देउन स्वप्नाच्या दुनियेत भटकावं,
मग हळुच तिच्या नकळत तिचं लाजणं निरखावं,
फक्त आणि फक्त तिचं होउन जावं।
साथ सुटेल का या भितीने तिच्या डोळ्यात आलेलं पाणि आपल्या हातांनी पुसावं,
वेडे मी फक्त तुझाच आहे म्हणुण तिला अलगद कवेत घ्यावं,
तिच्या फुललेल्या चेहर्यात भान हरपून जावं,
फक्त आणि फक्त तिचचं होउन राहावं।
No comments:
Post a Comment