Tuesday, 2 May 2017

माणसाची गोष्ट

आजे ए आजे उट की गं, ओ दादा बगा की उटतच नाय ही, काय झालं असलं हीला? आजुबाजूची जमा झालेली गर्दी पाहुन तो भानावर आला. कोणीतरी खांद्यावर हात ठेउन त्याला धिर देण्याचा प्रयत्न केला तसा तो ओक्साबोक्षी रडायला लागला.
   राहुल एक गोंडस मुलगा, जन्मला तेंव्हा 11 पौंडाचा होता म्हणे.आइ बाबा अगदी फुलासारखे जपत होते त्याला पण म्हणतात ना नियती कधी काय खेळ करेल हे सांगता येत नाही.त्यादीवशी देवदर्शनासाठी म्हणुन हे निघाले आणी रस्त्यात गाडीचा अॅक्सीडेंट झाला.राहुल चे आई बाबा तिथेच दगावले आणि हा गोंडस पोर मात्र अनाथ झाला.  रस्त्याच्या कडेने जाणार्या त्या म्हातारीने वेळेत त्याला पाहीला आणि त्याला आपल्या घरी घेउन आली.
    68 वर्षांची रख्मा आजी, परीस्थीतीमूळे क्रुश झालेलं शरीर. हिचं म्हणावं असं कुणीच नाही.,कुठून आणि कशी गावात आली देव जाणे. म्हातारी खुप धीट होती कोणालाही गरज असो म्हातारी नेहमी मदतीला हजर. कुठून शिकली होती देव जाणे ही गावची वैद्य पण होती, हिचा हात लागावा आणि कोणताही आजार चुटकीसरशी बरा व्हावा पण याबद्दल विचारलं असता ती म्हणायची "त्या पांडुरंगाची विच्छा बग,त्योच सगळ्याचा कर्ताधर्ता". अशी हि म्हातारी राहुलला पहील्यांदा घरी घेउन आली तेंव्हा "म्हातारी स्वताःला सांभाळू शकत नाही लेकराला काय सांभाळणार" म्हणुण लोकं खिल्ली उडवायला लागली. काही जणांणी तर तिला लेकरु आणलंस तिथे सोडुन दे असा फुकटचा सल्ला सुद्धा दिला पण म्हातारी कसलं ऐकतेय तिने जणू या लेकराला वाढवायचा विडाच ऊचलला होता.
     दिवसामागे दिवस जात होते तसा राहुल मोठा होत होता. आता त्याला समजायला लागलं,माय शिवाय आपलं कोणं नाय हे त्याच्या लक्षात यायला लागलं होतं. आता हा शाळेत जायला लागला, पुस्तकी शिक्षणाबरोबरच म्हातारीची शिदोरी याच्या बरोबर होतीच. हळू हळू राहुल सगळ्यांचा लाडका बनत चालला होता, अभ्यासात हुशार आणि खेळात चपळ असणार्या राहुल कडे पाहिल्यानंतर म्हातारीचा उर भरुन येइ पण त्याच्याच बरोबरीला आपल्यानंतर याचं कोणं असेल हा विचार तिला अस्वस्थ करुन जाइ.
    म्हातारी आता जास्तच क्रुश व्हायला लागली होती, राहुलही २० वर्षाचि झाला होता.याचं लग्न लाउन द्यावं आणि जवाबदारीतून मुक्त व्हावं हा विचार म्हातारीच्या मनात घरं करायला लागला,पण यांना साथ देइल ती नियती कसली. ज्या घरातून राहुलच्या लग्नाची वरात निघावी तिथे आज म्हातारीला खांदा द्यायला लोकं जमली होती.
     आजी ला शेवटचा निरोप देउन आलेला राहुल आज शांतपणे कोपर्यात बसला,त्याच्या माय विना त्याला घर खायला उठलं होतं. तिच्याविना आपलं इथे कोणीच नाही मग जगायचं तरी कोणासाठी हा विचार करुन राहुल घरासमोरील विहीरीत जिव देण्यासाठी निघाला. बाहेर जाण्यासाठी म्हणुण त्याने घराचा दरवाजा उघडला आणि दारासमोर टोपलीत ठेवलेल्या 3 महीन्यांच्या लहानग्या जिवाकडे पाहुन थबकला. जिव देण्याचा विचार आता त्याच्यापासून कोसो दुर लांब होता. त्या लहानग्या जिवाला अलगद हातात उचलून राहुल घरात आला.पुन्हा एकदा एका लहानग्या जिवाने कोणालातरी जगण्याची प्रेरणा दिली होती.

No comments:

Post a Comment