तिने त्याचा हात घट्ट पकडला होता. माणसाला ही उडवेल एवढ्या ताकदीचे वारे,धो धो कोसळणारा पाउस आणि सोबतीला अवेळी पडलेला अंधार, सगळेच कसे भयावह होते. एकमेकांना साथ देत कमरे एवढ्या पाण्यातुन ते दोघे चालू लागले. अचानकच पाण्याची लाट येइ आणि हे दोघे अलग होत पण लगेच तो तिचा हात पकडी. त्याच जवळ असणंच तिच्यासाठी अश्या परिस्थितीत धिर देणारं होतं.
तिन वर्षांपूर्वी या दोघांच लग्न झालं होतं. एकमेकांना साथ देत त्यांनी तिन वर्ष तर मजेत काढली पण आज त्यांची जणू काही अग्निपरीक्षाच होती. गेल्या दोन तासांपासुन " शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देउ" हे एकमेकांना दिलेलं वचन ते तंतोतंत पाळत होते.
पुर्वा आणि राहुल दोघेही एका नामांकित IT कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. रोज सकाळी लवकर उठुन घरातले कामं आटपायचे, डबा बनवायचा आणि आॅफिसला पळायचं हा त्यांचा रोजचा दिनक्रम. राहुलही पुर्वाला प्रत्येक कामात मदत करायचा.एकूणच दोघही संसारात छान रमले होते.
आज पुर्वाने राहुलला उठताचक्षणी आपल्याला डाॅक्टरांकडे जायचय ही आठवण करुन दिली. दोघांनीही आज आॅफिसला सुट्टि टाकली . डाॅक्टरांना भेटायचं आणि मग मस्त पैकी सिनेमा पाहायचा आणि मग बाहेरचं जेवण असा मस्त बेत होता.पण नियतीच्या मनात काय होते कुणास ठाउक.
राहुल आणि पुर्वा तुम्ही आइ बाबा होणार आहात. डाॅक्टरांच्या वाक्याने दोघांचे चेहरे फुलले. दवाखान्यातून निघताना दोघांच्या मनात आता नवचैतन्य पसरलं होतं. बाहेर पावसानेही आपलं रुप दाखवायला सुरवात केली होती. बघता बघता रस्त्यांवर कमरे इतक्या उंचिचं पाणी जमायला लागलं .आणि त्यातनं एकमेकांचा हात धरुन हे दोघे चालत होते.
अचानक त्या दोघांचा हात सुटला आणी पाण्याच्या वेगामुळे पुर्वा त्याच्यापासून दुर जायला लागली. राहुल ने तिच्यापर्यंत पोहोंचण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. आता दोघांनीही देवाचा धावा करायला सुरुवात केली,कारण तोच यातन ह्या दोघांना एकत्र आणू शकणार होता.
पुर्वाचे डोळे उघडले तेंव्हा ती दवाखान्यात पलंगावर पडली होती. नर्सला विचारल्यानंतर तिला कळालं, रस्त्याच्या एका कडेला बेशुद्ध अवस्थेत ही एकाला सापडली त्या माणसाने वेळेत हिला दवाखान्यात आणलं आणि हिचा जिव वाचला पण डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही तिच्या पोटातला जिव ते वाचवू शकले नाहीत. पण राहुल कुठे आहे ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच न्हवतं. त्याच्यावीना आयुष्य कसं काढायचं या विचाराने तिला कापरं भरलं.
तिकडे राहुल ला शुद्ध आली तेंव्हा तिच्या जवळ नसण्याच्या आठवणीने त्याला सुन्न केलं. ती जिवंत असेल का नाही हेही माहीत न्हवतं. तिला आयुष्यात परत भेटता येईल का नाही या विचारातच तो दवाखान्यातल्या रुम मधून बाहेर आला.
ईकडे राहुलच्या आठवणीने कावरीबावरी झालेल्या पुर्वाने रडतच राहुलला आवाज दिला आणी नेमका बाहेरुन जाणार्या राहुलच्या तो कानावर पडला.राहुल ने त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. पुर्वा दिसताच धावत जाउन त्याने तिला मिठीत घेतलं, आणि दोघही आनंदाश्रूनी भिजून गेले.आज परत एकदा प्रेमाने सगळ्या संकटांवर मात केली होती.
Wednesday, 30 August 2017
तो आणि ती —२
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment