Wednesday, 30 September 2020

Aji

माझ्या प्रत्येक कोर्या पानावर रेखाटलीस तू तुझ्या संस्कारांची शाई,
तुझ्या असण्यानेच झालं आमच्या आयुष्याचं सार्थक आई,
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याचं पान सुद्धा हालत नाही,
म्हणूनच माझी आजी असूनही म्हणते मी तुला आई!

मी कृष्ण झाले तर तू झालीस माझी यशोदा,
माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होती तुझी साथ सदा,
तुझ्याविना मला माझ्या आयुष्याचा विचारच करवत नाही,
म्हणूनच माझी आजी असूनही म्हणते मी तुला आई!

तुझ्या सोबतीने आयुष्यात सर केली मी अनेक शिखरे,
तूझा हात होता डोक्यावर म्हणून बदललं माझं आयुष्य खरे,
कळत नाही तुझ्या या ऋणांची होऊ कशी मी उतराई,
म्हणूनच माझी आजी असूनही म्हणते मी तुला आई!

२५ वर्षांपासून तू प्रेमाने वाढवलस आम्हाला,
तुझ्यामुळेच आयुष्याचा खरा अर्थ कळाला मला,
एक उत्तम आजी असल्याचा उदाहरण आहेस तू आई,
म्हणूनच माझी आजी असूनही म्हणते तुला मी आई!

No comments:

Post a Comment