पण त्याच्यासाठी दिवस तर आत्ता सुरू झाला होता,
पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याच्या आठवणींचे कप्पे उघडले,
पण ह्याचा मात्र ध्येयाकडे प्रवास आता सुरू झाला होता.
पक्ष्यांचा थवा उडत उडत घरट्याकडे निघाला होता ,
हा मात्र त्यांना बघत कवेत घेण्याचा प्रयत्न करत होता ,
गाडीच्या कर्कश्श आवाजाने त्याची तंद्री भंगली,
गाडीत बसुन याचा ध्येयाकडे प्रवास सुरू झाला होता.
रस्त्यावर नेहमीप्रमाणेच शाळकरी मुलांची गर्दी होती,
प्रत्येक जण काम संपवून घरी जाण्याच्या घाईत होता ,
क्षणभर याचे मन देखील परत फिरण्याचे संकेत देत होते,
पण आता ते शक्य न्हवते कारण त्याचा प्रवास तर आत्ताच सुरू झाला होता.
त्याला पोहोंचवून गाडी देखील परत फिरली,
हा मात्र अग्नीच्या ज्वालांमध्ये तिथे एकटाच होता,
कोण अणि काय आपल्या मागे राहिले ह्याची आता त्याला जाणीव नव्हती,
कारण आता त्याचा अनंताकडे प्रवास सुरू झाला होता.
- ईशान
No comments:
Post a Comment