Wednesday, 21 March 2018

माझी कवीता

भावनांना बांध फुटतो, जुळता मन मनाशी,
एकाकी मन बोलू लागते कुठेतरी स्वताःशी,
शब्दांना ही मग हुरुप येतो होते जुळवा जुळव मग अशी,
मन भिरक्या घेउ लागते स्वतःच्या कवितांपाशी!

शब्दांच्या ही जोड्या जुळती आपल्याच मनाशी,
कागदावर शाई उतरते खेळ खेळत शब्दांशी,
मन माझे वेडे गुंफते ही सुंदर माळा शब्दांची,
कागदावर उतरते कविता ही माझी अशी!



No comments:

Post a Comment