आयुष्याच्या उत्तरार्धात फक्त एकमेकांची साथ असते,
मग हातात हात गुंफून दोघेच बाहेर पडतात,
दोघांनाही आता varyachihi साथ असते,
मग हळूच नकळत आजोबा आज्जीला भेळेच्या gadyakade नेतात,
आजीही मग भेळ मिटक्या मारत खाते,
वेळ असते मग आजोबांचे आवडते आईस्क्रीम खाण्याची,
मग दोघांना ही आईस्क्रीम च्या konachi साथ असते!
आठवते आजोबांना मग ती पहिली भेट,
आजींच्या गालावर रुळणारे ते मउमउ केस,
पण केसांची जागा आता सुरकुत्यांनी घेतलेली असते,
दोघांना ही साथ आता आठवणींची असते!
मग हळूच आजोबा घड्याळात बघतात,
खुप उशीर झालाय म्हणूण आजीला खुणावतात,
आजीही थोडावेळ बसूया म्हणूण लाडीक गळ घालते,
दोघांना ही साथ आता समुद्राची असते!
— ईशान
No comments:
Post a Comment